In essence: Cross-examination is not about asking many questions—it’s about asking the right ones, at the right time, for the right purpose.
भारतीय साक्षी-पुरावा कायदा 1872 Indian Evidenece Act 1872 and Bharatiya Saksha Adhiniyam 2023 मध्ये प्रकरण 10 मध्ये साक्षिदारांची तपासणी हे प्रकरण देण्यात आले आहे. जुन्या साक्ष पुरावा अधिनियमात कलम 135 ते 166 (Sections 135 to 166) या कलमांमध्ये सरतपास, उलटतपास, फेरतपास, फेरउलटतपास आदी पुरावा नोंदिबाबत तरतुदी दिल्या आहेत. तर नवीन भारतीय साक्ष अधिनिय 2023 मध्ये कलम 140 ते 169 (Sections 140 to 168 BSA) मध्ये साक्षीदाराच्या तपासाबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत.
जुन्या कायद्यात असलेले कलमे आणि नवीन कायद्यातील कलमे थोड्याफार फरकाने सारखीच आणि सुसंगत आहेत. त्यामुळे या लेखात फक्त नवीन Bharatiya Saksha Adhiniyam 2023 मधील प्रकरण 10, Examination of Witnesses मधील कलमांचा आढावा घेण्यात आला आहे. कलम 137 मध्ये तर नवीन कायद्यात 142 मध्ये सरतपास, 139 आणि 144 मध्ये उलटतपास बाबत तरतुद करण्यात आली आहे. जुन्या आणि नवीन कायद्यात अनुक्रमे कलम 138 आणि 143 मध्ये साक्ष तपासाचा क्रम देण्यात आला आहे. साक्ष तपासणी आणि उलटतपासणी ही तथ्याशी संबंधीत असली पाहिजे. मात्र उलटतपास साक्षीदाराने त्याचे सरतपासणीत सांगितलेल्या तथ्यांशीच संबंधीत असावा असे नाही. म्हणजेच उलटतपासात तथ्य शाबीत करण्यासाठी कोणतेही प्रश्न, जे की तथ्याशी संबंधीत आहेत, असे प्रश्न विचारण्याची परवानगी असते. नविन पुरावा, नविन बाब, तथ्य खटल्याच्या संपरिक्षेदरम्यान समोर आले तर न्यायालयाच्या परवानगीने पुनर्तपास घेता येतो. आणि त्यानंतर पुन्हा उलटतपास घेतला जाऊ शकतो.
पुरावा घेण्याबाबतीत महत्वाची लिडींग प्रश्न म्हणजेच उत्तरसूचक प्रश्न म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा कायद्यात देण्यात आली आहे. कोणते आणि कधी उत्तर सूचक प्रश्न कधी विचारायचे नाहीत, याबाबत सुद्धा सांगितले आहे. उत्तर सूचक प्रश्न सरतपासात विचारायचे नाहीत आणि विवादीत प्रश्न नसेल आणि असा प्रश्न अगोदरच दिलेल्या उत्तराकडे निर्देश करणारा असेल तर न्यायालय असे प्रश्न विचारण्यास मूभा देवू शकते.
तर उलटतपासात उत्तर सूचक प्रश्न विचारले जावू शकतात, याबाबत सुद्धा विवेचन करण्यात आले आहे. असले प्रश्न उलटतपासात विचारले जावू शकतात. उलटतपासात कोणतेही प्रश्न विचारले जावू शकतात, याचा अर्थ कोणतेही आणि मोकाट प्रश्न असा मात्र नाही.
साक्षीदाराचा हेतूपुरस्सर अपमान करणारे, त्रास देणारे प्रश्न, अनावश्यक प्रश्न विचारण्यास न्यायालय अटकाव घालू शकते. प्रत्यक्ष उलटतपास होण्यापूर्वी साक्षीदार कोर्टाची फाईल पाहून त्याचा जबाब वाचू शकतो. म्हणजेच मेमरी रिफ्रेश करू शकतो, हा त्याचा अधिकार आहे. त्यामूळे एखादा पक्षकार म्हणू शकणार नाही, की साक्षिदार हा कोर्टाची फाईल वाचून उत्तरे देत आहे.
उलटतपास घेणे ही खुप मोठी कला असून अनुभव आणि ज्या प्रकरणात उलटतपास घ्यावयाचा आहे त्या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ती कला पूर्णत्वास जात नाही. त्या प्रकरणाचा अभ्यास न करता आणि मूलतत्वे न पाळता प्रकरण चालविले, तर वरिष्ठ न्यायालयात झालेल्या अपिलात सुद्धा आपली हार नक्की आहे. कारण मूळ खटल्यातील साक्षीपुरावे हेच पाया असतात.
दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणांना भारतीय साक्षीपुरावा कायदा लागू असल्याने उलटतपासणीसाठीची नियमावली सर्वांना लागू होते. खालील काही महत्वाचे नियम दिले आहेत, ते क्रमशा: पाहूया.
उलटतपासाची 12 मूलतत्वे | FUNDAMENTALS OF CROSS-EXAMINATION
1) साक्षीदारांवर ताबा मिळविणे | Control over Witness : साक्षिदारावर वचक निर्माण करून, त्याचे मानसिक संतूलन बिघडले पाहिजे असे प्रश्न असले पाहिजेत. मात्र साक्षिदाराला विनाकारण त्रास द्यायचा किंवा त्यांचा अपमान करण्याचे हेतूने प्रश्न विचारायचे असा त्याचा अर्थ नाही. त्याच्यावर कमांड निर्माण करावे, तो आपल्या नियंत्रणात आनावे. (No insulting, defamatory and irritating questions)
2) छोटे प्रश्न, सोपी भाषा | Short and simple questions : छोटे प्रश्न असावेत आणि साक्षिदाराला समजेल अशी साधी भाषा ( Small questions and Simple language) असावी. यामूळे आपल्याला हवे असलेले आणि स्पष्ट उत्तर मिळतील. जसे की, आपण कोणत्या विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे?
3) सरतपासणीत सांगितलेल्या प्रश्नावर प्रती प्रश्न नको | No interrogating on chief examinations: साक्षीदाराने सरतपासात जे सांगितले ते प्रश्न उलट तपासात विचारने टाळावे. तर जे सरतपासणीत सांगितले आहे, ते खोटे कसे आहे, ही शाबीत करणारे प्रश्न विचारले जावेत. जसे की, सरतपासणीत जर असे सांगितले की, मला संदीपने चाकूने उजव्या हातावर मारले. तर त्याला कुणी मारले आणि कुठे मारले हा प्रश्न विचारू नये.
4) शक्यतोवर उत्तर सूचक प्रश्नच | Leading Questions Only: उलट तपास घेताना शक्यतो उत्तर सूचक प्रश्नच विचारावेत. जसे की, आपण चहाचे दुकान चालविता?, औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा आहे?
5) माहिती नसलेल्या बाबींवर प्रश्न नको | No questions on facts not knew: आपल्याला आपल्या प्रशाचे उत्तर माहिती नसेल तर प्रश्न विचारू नये. कारण साक्षिदाराने त्याचे उत्तर काहीही सांगितले तरी ते आपल्याला मान्य असल्याचे समजले जाईल.
6) पहिल्या प्रश्नाला अनुसरून दूसरा प्रश्न | Relevant Questions: साक्षिदार उत्तर देत असताना त्याचे उत्तर पुर्णपणे आणि शांततेने ऐकूनच दुसरे प्रश्न त्याला अनुसरून विचारले पाहिजेत (Questions relevant to earlier question).
7) साक्षीदारासोबत वाद नको | No Unnecessary arguments, quarrels with witness: साक्षिदारासोबत भांडण, वाद करू नये. त्यामूळे आपले संतूलन बिघडून आपलेच नुकसान होईल आणि आपण केलेली तयारी बिनाकामाची होईल.
8) सर्व साक्षीदारांना सारखेच प्रश्न नको | Repetation of questions: एखाद्या प्रकरणात अनेक साक्षिदार असतात तेव्हा सर्व साक्षिदारांना सारखेच प्रश्न विचारू नयेत. नसता, ते साक्षिदार दुसर्या साक्षिदाराना त्याबाबत माहिती देताना आणि येणारा साक्षिदार सुद्धा तेच उत्तर देतो. ज्यामूळे आपल्या केसवर परिणाम होतो. अशा स्थितीत प्रश्न जरी एकच असला तरी त्याची विचारण्याची पद्धत बदलावी.
9) मुद्दा स्पष्ट करण्याची संधी नको | No opportunity for explanation: साक्षिदाराने प्रश्नाचे उत्तर दिल्यावर त्याला आपला मुद्दा स्पष्ट करू देण्याची संधी देण्यात येवू नये. फक्त हो, नाही असे उत्तर देण्यास त्याला बाध्य करावे, जेणे करून आपला प्रश्न विचारण्याचा हेतूच नष्ट होणार नाही.
10) अमान्य सूचना | Suggestions: साक्षिदाराला त्याचे सरतपासणीतील साक्षीनुसार, योग्य अमान्य सूचना, सजेशन देण्यात यावेत. नाही तर त्याने सरतपासणीत जे सांगितले ते आपल्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो.
11) विसंगती | Contradictions: अगोदरचे साक्षीदार यांनी सांगितलेल्या बाबी आणि सध्याचा साक्षीदार जे सांगत आहे, त्यात काही विरोधाभास असेल, विसंगती असेल तर त्याबाबत सुद्धा प्रश्न विचारले जावेत.
12) वगळलेले प्रश्न/ भाग | Omissions: तसेच पोलिसांना दिलेला जबाब, कोर्टात केलेले कथन आणि उलटतपासात केलेले कथन यामध्ये काही भाग, तथ्य उगळले गेल्याचे दिसून आले तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत.