अनुसूचित जातीचा दर्जाबाबत प्रास्ताविक Scheduled Caste Status, Dalit Christians, Dalit Muslims, Reservation Controversy, K.G. Balakrishnan Commission.
भारतातील आरक्षणाची व्यवस्था ही केवळ आर्थिक सक्षमीकरणासाठी नसून ती ज्या समाज घटकाने शतकानुशतके सोसलेल्या सामाजिक विषमतेवर आणि अस्पृश्यतेवर आधारित आहे. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून एक महत्त्वाचा प्रश्न भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत प्रलंबित होता, आणि तो प्रश्न म्हणजे "जर एखादी व्यक्ती दलित (अनुसूचित जाती) असेल आणि तिने ख्रिश्चन किंवा इस्लाम वा अन्य धर्म स्वीकारला, तर तिचा 'अनुसूचित जाती'चा दर्जा कायम राहील का?" नुकतेच केंद्र सरकारने या विषयावर अभ्यास करण्यासाठी 'के.जी. बालकृष्णन आयोग' स्थापन केल्याने या जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या आयोगाला 10 एप्रिल 2026 पर्यंत आपला अहवाल दाखल करायचा आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 2026 रोजी एक ऐतिहासिक निकाल दिला आहे; ज्यामुळे हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म सोडून इतर धर्मात गेलेल्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही किंवा त्यांचा दर्जा तात्काळ समाप्त होईल असा हा निकाल आहे. तर हा निकाल का लागला आणि त्याचा आधार काय आहे? याबाबत आपण माहिती घेवूयात...
प्रकरणाची पार्श्वभूमी Background of the case Chinthada Anand vs State of Andhra Pradesh
(In Chinthada Anand v. State of Andhra Pradesh (Criminal Appeal No. 1580 of 2026), the appellant, born into the Madiga community, alleged he was wrongfully restrained and assaulted with casteist slurs by members of the dominant Reddy community. The appellant, who had been practising as a Christian pastor for a decade, sought protection under the SC/ST Act.)
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि 1950 चा राष्ट्रपतींचा आदेश Constitution Order 1950, Article 341, Religious Conversion and Caste, Social Justice India, Ranganath Misra Commission, Sachar Committee Report.
भारतीय संविधानातील कलम 341 (1 )नुसार, राष्ट्रपतींना एखाद्या विशिष्ट समूहाला 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. 10 ऑगस्ट 1950 रोजी राष्ट्रपतींनी काढलेल्या आदेशानुसार (Constitution (Scheduled Castes) Order, 1950), केवळ हिंदू धर्मातील व्यक्तींनाच 'अनुसूचित जाती'चा दर्जा दिला जाऊ शकत होता. या आदेशात तत्कालीन 15 प्रदेशांमधील क्षुद्र/अस्पृश्य जातीचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात आला आहे. कालांतराने, 1956 मध्ये शिख धर्मातील मजहबी आणि रामदासीय दलितांना आणि 1990 मध्ये बौद्ध धर्मातील दलितांना (नवबौद्ध) या कक्षेत समाविष्ट करण्यात आले. याचे मुख्य कारण असे दिले गेले की, हे धर्म 'भारतीय' वंशाचे आहेत आणि त्यांच्यामध्येही अस्पृश्यतेचे अंश आढळतात. मात्र, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय दलितांना यातून आजही वगळण्यात आले आहे.
"ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय दलितांना अनुसूचित जातीचा (SC) दर्जा का दिला जात नाही? १९५० चा राष्ट्रपतींचा आदेश, के.जी. बालकृष्णन आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील वादाचे सविस्तर विश्लेषण वाचा या विशेष लेखात."
वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
हा वाद प्रामुख्याने दोन दृष्टिकोनांमधील संघर्षातून निर्माण झाला आहे:
धर्मांतरामुळे जात जात नाही (समर्थकांचा युक्तिवाद): जे लोक ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारलेल्या दलितांना SC दर्जा देण्याचे समर्थन करतात, त्यांचे म्हणणे आहे की धर्मांतर केल्याने व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बदलत नाही. भारतीय समाजात जात ही इतकी खोलवर रुजलेली आहे की ती धर्म बदलल्यानंतरही व्यक्तीची पाठ सोडत नाही. ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजातील दलितांना आजही त्याच प्रकारच्या भेदभावाचा आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो, जो हिंदू दलितांना करावा लागतो. त्यामुळे त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे.
धर्मात अस्पृश्यतेची संकल्पना नाही (विरोधकांचा युक्तिवाद)
दुसरीकडे, सरकार आणि काही सामाजिक संघटनांचा असा युक्तिवाद आहे की ख्रिश्चन आणि इस्लाम हे समतावादी धर्म आहेत. या धर्मांमध्ये 'अस्पृश्यता' नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. अनुसूचित जातीचा दर्जा हा केवळ त्या लोकांसाठी आहे; ज्यांनी ऐतिहासिकरीत्या हिंदू धर्मातील अस्पृश्यतेचा सामना केला आहे. जर धर्मांतरित दलितांना SC दर्जा दिला, तर मूळ अनुसूचित जातींच्या वाट्याचा आरक्षणाचा लाभ कमी होईल, अशी भीतीही व्यक्त केली जाते.
सरकारची भूमिका आणि न्यायव्यवस्थेतील स्थिती
सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अनेक याचिका दाखल आहेत. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, केवळ धर्माच्या आधारावर आरक्षणापासून वंचित ठेवणे हे संविधानातील कलम 14 (Equality Before Law समानतेचा अधिकार) आणि कलम 15 (prohibits discrimination by the state against any citizen on grounds only of religion, race, caste, sex, place of birth, or any of them) धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई) यांचे उल्लंघन आहे. केंद्र सरकारने यापूर्वी न्यायालयात असे प्रतिपादन केले होते की, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात गेल्यानंतर व्यक्तीची सामाजिक मागासलेपण संपते. मात्र, रंगनाथ मिश्रा आयोग (2007) आणि सच्चर समितीच्या अहवालांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील दलितांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे.
बालकृष्णन आयोगाची स्थापना Debate on SC status for converted Dalits, Reservation for Christian and Muslim Dalits in India, Impact of conversion on caste identity.
ऑक्टोबर 2022 मध्ये केंद्र सरकारने भारताचे माजी सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन सदस्यीय आयोग स्थापन केला आहे. या आयोगाची मुख्य जबाबदारी खालील मुद्द्यांवर अभ्यास करणे आहे:
1) नवीन धर्मात प्रवेश केल्यानंतरही अस्पृश्यतेचा कलंक कायम राहतो का?
2) या लोकांना अनुसूचित जातीचा दर्जा दिल्यास सध्याच्या SC यादीतील समुदायांवर काय परिणाम होईल?
या आयोगाला दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आता त्याची मुदत 10 एप्रिल 2026 अशी वाढविण्यात आली आहे. या आयोगाचा अहवाल भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सामाजिक आणि राजकीय परिणाम
हा मुद्दा केवळ कायदेशीर नसून अत्यंत संवेदनशील राजकीय मुद्दा आहे.
1) धार्मिक परिणाम: ख्रिश्चन आणि मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे की, आरक्षणाअभावी त्यांच्या समाजातील गरीब दलितांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी मिळत नाही.
2) राजकीय गणित: अनेक दलित संघटनांना वाटते की, जर ख्रिश्चन आणि मुस्लीम दलितांना SC दर्जा मिळाला, तर स्पर्धेत वाढ होईल आणि मूळ हिंदू, शीख आणि बौद्ध दलितांचे नुकसान होईल.
निष्कर्ष
ख्रिश्चन आणि मुस्लीम दलितांच्या अनुसूचित जातीच्या दर्जाचा प्रश्न हा मानवी हक्क, सामाजिक वास्तव आणि घटनात्मक तरतुदी यांच्यातील गुंतागुंतीचा विषय आहे. अस्पृश्यता ही केवळ हिंदू धर्माची समस्या आहे की ती भारतीय मानसिकतेचा भाग आहे, यावर या संपूर्ण वादाचे उत्तर अवलंबून आहे.
जर आरक्षणाचा मूळ उद्देश ऐतिहासिक अन्याय दूर करणे हा असेल, तर केवळ धर्म बदलला म्हणून एखाद्याचे सामाजिक दुःख कमी होत नसेल, तर त्याला न्याय मिळणे आवश्यक आहे. मात्र, हे करताना विद्यमान अनुसूचित जातींच्या अधिकारांचे संरक्षण कसे करायचे, हे सरकार आणि न्यायव्यवस्थेसमोर मोठे आव्हान आहे. बालकृष्णन आयोगाचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकेल, अशी अपेक्षा आहे.
Tags
Supreme Court
