सावरकर माफीवीरच: व्ही. डी. सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांच्या न्यायालयातील कबूली जबाबामुळे सिद्ध

न्यायालयातच सावरकरांनी पाच वेळा ब्रिटीश सरकारकडे दया याचिका सादर केल्या होत्या अशी स्पष्ट कबुलीच विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांची न्यायालयात स्पष्ट कबूली दिली आहे. पुढील लिंक वाचा- A Special MP/MLA Court in Pune was recently informed that right-wing ideologue Vinayak Savarkar had filed five mercy petitions with the then British government and had also appealed recruitment in British government during the World War II. सत्यकी सावरकर यांच्या साक्षात न्यायालयातील कबूली जाबाबमुळे आता सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे; तर माफीवीरच होते हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल लंडन मध्ये एका भाषणामध्ये अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल पुणे येथील विशेष आमदार/खासदार न्यायालयात दाखल केलेल्या अवमान तक्रार अर्जावरील उलटतपासणीमध्ये दिनांक 02 मे 2026 रोजी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर सत्यकी सावरकर यांनी सावरकरांचे ऐतिहासिक दृष्टिकोन आणि त्यांचे विचार स्पष्ट शब्दात सांगितले आहेत. त्यामुळे सावरकर यांचे विचार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान सावरकरांच्या दया याचिका आणि गोवंशाबद्दलच्या त्यांच्या भूमिकेवर महत्त्वाची विधाने केली आहेत. This comes in the testimony of Satyaki Savarkar, the grandnephew of Savarkar, who has lodged a criminal defamation case against Congress leader Rahul Gandhi for allegedly defaming Savarkar by delivering a speech in London.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. सावरकर जितके त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात, तितकेच त्यांच्या काही भूमिकांमुळे ते वादाच्या केंद्रस्थानीही राहिले आहेत. नुकत्याच पुणे येथील एका विशेष न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यादरम्यान, सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींची कबुली दिली. यात सावरकरांनी ब्रिटीश सरकारला सादर केलेल्या दया याचिका आणि गाईबद्दलचा त्यांचा 'उपयुक्त पशू' हा दृष्टिकोन यांचा समावेश आहे. या विधानांमुळे सावरकरांची विचारधारा कशी विरोधाभासी आहे हे स्पष्ट होत आहे. एकीकडे हिंदू धर्माचे गोडवे गायचे आहे आणि दुसरीकडे गायीला पवित्र न मानता एक उपयोगी प्राणी मानायचे हे दिसून येत आहे. 

न्यायालयात सत्यकी सावरकर यांनी मान्य केले की, सावरकरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना पाच वेळा ब्रिटीश सरकारकडे दया याचिका (Mercy Petitions) सादर केल्या होत्या. मात्र, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, अशा याचिका केवळ सावरकरांनीच नव्हे, तर त्या काळातील अनेक राजकीय कैद्यांनी दिल्या होत्या. ऐतिहासिक संदर्भांनुसार, सावरकरांनी 1911, 1913, 1914, 1918 आणि 1920 मध्ये या याचिका सादर केल्या होत्या. या याचिकामधून सावरकर यांनी जेलबाहेर येण्यासाठी ब्रिटिश सरकारला विनंत्या केल्या होत्या. स्वातंत्र्य संग्रामात अनेक सैनिकांनी हसत हसत गळफास स्वीकारला मात्र; माफी मागितली नाही. मात्र सावरकरांनी माफी मागीतल्याने ते स्वातंत्र्यवीर कसे ? हा प्रश्न अनेक वर्षांपासून देशासमोर उभा आहे. त्यामुळेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यास देशभरातून विरोध होत आला आहे. स्वातंत्र्य संग्राम महत्वाचा की, आपले प्राण महत्वाचे? एक दोन वेळा नव्हे तर पाच वेळा माफी/दया मागणारा व्यक्ति स्वातंत्र्यवीर कसा होवू शकतो? हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे त्याचे उत्तर असे आहे की, सावरकर हे माफीवीरच होते हे स्पष्ट झाले आहे.

याच उलटतपासणीत गाय हा एक उपयुक्त पशू आहे, देव नव्हे असे सावरकर यांचे विचार होते, असे सत्यकी सावरकर यांनी मान्य केले. एकीकडे कट्टर हिंदू धर्माचे समर्थन करायचे आणि ज्या पशूला समस्त हिंदू समाज पवित्र प्राणी मनात आला आहे, त्या गायीला "सावरकरांनी गाईला कधीही 'देव' मानले नाही, तर तिला केवळ एक 'उपयुक्त प्राणी' मानले." असे सत्यकी सावरकर यांनी न्यायालयात सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post