भारतीय राज्यघटनेत दिलेले 11 मूलभूत कर्तव्ये, WHAT ARE 11 FUNDAMENTAL DUTIES?

भारतीय राज्यघटनेत दिलेले 11 मूलभूत कर्तव्ये
11 FUNDAMENTAL DUTIES GIVEN IN THE CONSTITUTION OF INDIA


ज्यावेळी भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो भारतीय असो की विदेशी नागरिकांना मूलभूत हक्क / अधिकार भारतीय संविधानाने दिले आहेत; त्याचवेळी काही जबाबदाऱ्याही त्यांना पार पाडाव्या लागतात. ही मुलभुत कर्तव्ये/ FUNDAMENTAL DUTIES मूळ भारतीय

राज्यघटनेचा भाग नव्हती. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात 1976 (Emergency in India) मध्ये सरदार सुवर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारशीवरुन 1976 मध्ये 42 वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. 

तर 2002 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपई यांच्या काळात 86 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि, त्यात 11 वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे. जगाच्या राज्यघटनांचा विचार केल्यास, मूलभूत कर्तव्य जपानच्या राज्यघटनेत सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा क्रमांक लागतो.

स्वर्ण सिंह समिती 1976
Swaran Singh committee 1976  Recommendations in Marathi

तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अंमलात आणलेल्या आणीबाणीच्या काळात देशभर संताप व्यक्त होत होता. त्यामध्ये देशभर आंदोलने झाली, त्यात सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. देशभर झालेले आंदोलन हे मूलभूत हक्क, अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप करून सुरू झाले होते. त्यामुळे नागरिकांना मूलभूत अधिकारांसोबत आपल्या कर्तव्यांची सुद्धा जाणीव असावी हे उद्देश समोर ठेवून तत्कालीन संरक्षण मंत्री सरदार सुवर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 1976 मध्ये समिति नेमण्यात आली. या समितीच्या शिफारशीवरुन 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत अनेक नवीन तरतुदी करण्यात आल्या. त्यापैकीच मूलभूत कर्तव्य आहेत. समितीने केलेली शिफारस मान्य होवून राज्यघटनेतील भाग 4 मध्ये अनुच्छेद 51A नव्याने समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेतील भाग चारमध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने पुरोगामी राज्य निर्मितीसाठी करावयाची कामे दिलेली आहेत. त्यानंतर याच भाग 4 मधील अनुच्छेद 51 मध्ये 51A जोडून त्यात 10 मूलभूत कर्तव्ये Fundamental Duties देण्यात आली आहेत.

राज्यघटनेत दिलेली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत? | Full List of 11 Fundamental Duties in Marathi


1) संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.

2) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.

3) भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.

4) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.

5) धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.

6) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे.

7) वने सरोवरे नद्या वन्यजीव सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.

8) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी त्यांचा विकास करणे.

9) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे.

10) राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे.

11) जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या सहाव्या वर्षापासून 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (11 वे कर्तव्य 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले.)


मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये Characteristics of Fundamental Duties in the Constitution of India

1) मूलभूत कर्तव्य ही नैतिकतेवर आधारित आहेत.

2) मूलभूत कर्तव्ये भारतीय संस्कृति, जीवनपद्धतीचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या दृष्टीकोनातून समाविष्ट करण्यात आले आहेत.

3) मूलभूत हक्काप्रमाणे मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेता नाही.

मूलभूत कर्तव्यांवर होत असलेली टीका Criticism on Fundamental Duties in the Constitution of India

1) भारताच्या राज्यघटनेत राज्याची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क आणि कायदे यानुसार नागरिकांचे वर्तन नियंत्रित करता येते. कठोर कायदे निर्माण करण्याचे सोडून मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करणे म्हणजे कायद्याविषयी दुराग्रह निर्माण करणे होय.

2) मूलभूत कर्तव्यांमध्ये सुदृढ लोकशाहीसाठी नियमित मतदान करणे, न चुकता कर भरणे, कुटुंबनियोजन करणे, निधर्मी समाज व्यवस्था निर्माण करणे आदी कर्तव्यांचा समावेश नाही.

3) मूलभूत कर्तव्य मध्ये काही संकल्पना अस्पष्ट आहेत. स्वतंत्र लढ्यातील आदर्श, संस्कृती, उपक्रम ई.

4) मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसणे म्हणजे दंड सत्तेचा आधार नाही त्यामुळे ही कर्तव्य नैतिक तत्त्वे ठरतात.

5) मूलभूत कर्तव्य भाग-3 मध्ये असणे जास्त योग्य ठरले असते. भाग चार मध्ये चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.

मूलभूत कर्तव्यांचे महत्व काय आहे?
What’s Importance of fundamental duties in Constitution of India?

1) नागरिकांना आपल्या अधिकारांच्या सोबतच आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे महत्त्वाची आहेत.

2) मूलभूत कर्तव्य समाजविघातक व हिंसक कृती करण्यापासून नागरिकांना अटकाव करतात.

3) नागरिकांमध्ये शिस्त, जबाबदारी निर्माण करण्यासोबतच नागरिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी मूलभूत कर्तव्य महत्त्वाचे आहेत.

4) मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला असल्याने भविष्यात एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी आणि मूलभूत कर्तव्यानुसार नागरिकांचे वर्तन नसल्यास संसदेला त्यावर एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post