कलम 4. लोकसेवकाने कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल शिक्षा किंवा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यावर किंवा होण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये...
अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची लोकसेवक नसेल अशी व्यक्ती, कर्तव्ये पार पाडण्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करील, त्यास सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल; परंतु एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा होईल.
Punishment for neglect of duties-
(1) Whoever, being a public servant but not being a member of a Scheduled Caste or a Scheduled Tribe, wilfully neglects his duties required to be performed by him under this Act and the rules made thereunder, shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than six months but which may extend to one year.
(2) पोटकलम नुसार लोकसेवकाच्या कर्तव्यात पुढील कर्तव्यांचा समावेश आहे:-
(a) खबर देणाऱ्याने दिलेली तोंडी माहिती वाचून दाखविणे, आणि खबर देणाऱ्याची सही घेण्यापूर्वी, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने ती लेखनिविष्ट करणे;
(b) या अधिनियमान्वये व अन्य संबंध तरतुदींन्वये तक्रार किंवा प्रथम माहिती अहवाल नोंदविणे आणि या अधिनियमाच्या समुचित कलमाखाली ती नोंदवणे;
(c) अशा प्रकारे नोंदविलेल्या माहितीची एक प्रत तात्काळ खबर देणाऱ्यास सादर करणे;
(d) पीडित व्यक्तींचा किंवा साक्षीदारांचा जबाब नोंदविणे;
(e) साठ दिवसांच्या आत, अन्वेषण करणे आणि विशेष न्यायालयात किंवा अनन्य विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, आणि कोणताही असल्यास, विलंब स्पष्ट करणे;
(f) कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख अचूकपणे तयार करणे, त्याची संरचना करणे व त्याचा अनुवाद करणे;
(g) या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमांन्वये अन्य कोणतीही कर्तव्ये पार पाडणे :
परंतु, लोकसेवकाच्या विरुद्ध यासंबंधातील दोषारोप, प्रशासकीय चौकशीच्या शिफारशीवरून नोंदविण्यात येतील.
(h) लोकसेवकाने पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कर्तव्याच्या कर्तव्यच्युतीच्या बाबतीतील दखल विशेष न्यायालयाकडून किंवा अनन्य विशेष न्यायालयाकडून घेण्यात येईल आणि अशा लोकसेवकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचा निदेश देण्यात येईल.
(2) The duties of public servant referred to in sub-section (1) shall include––
(a) to read out to an informant the information given orally, and reduced to writing by the officer in charge of the police station, before taking the signature of the informant;
(b) to register a complaint or a First Information Report under this Act and other relevant provisions and to register it under appropriate sections of this Act;
(c) to furnish a copy of the information so recorded forthwith to thein formant;
(d) to record the statement of the victims or witnesses;
(e) to conduct the investigation and file charge sheet in the Special Court or the Exclusive Special Court within a period of sixty days, and to explain the delay if any, in writing;
(f) to correctly prepare, frame and translate any document or electronic record;
(g) to perform any other duty specified in this Act or the rules made thereunder: Provided that the charges in this regard against the public servant shall be booked on the recommendation of an administrative enquiry.
(3) The cognizance in respect of any dereliction of duty referred to in sub-section (2) by a public servant shall be taken by the Special Court or the Exclusive Special Court and shall give direction for penal proceedings against such public servant.]
कलम 5. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नंतरच्या दोषसिद्धीबद्दल वाढीव शिक्षा?
जो कोणी, या प्रकरणाखालील एखाद्या अपराधाबद्दल पूर्वीच सिद्धदोष ठरलेला असताना दुसऱ्या अपराधाबद्दल किंवा दुसऱ्या अपराधानंतरच्या कोणत्याही अपराधाबद्दल सिद्धदोष ठरला असेल त्याला एक वर्षांहून कमी नाही इतकी परंतु जी त्या अपराधासाठी उपबंधित शिक्षेच्या मुदतीइतकी वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल.
5. Enhanced punishment subsequent conviction.—Whoever, having already been convicted of an offence under this Chapter is convicted for the second offence or any offence subsequent to the second offence, shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than one year but which may extend to the punishment provided for that offence.
कलम 6. भारतीय दंड संहिता आणि भारतीय न्याय संहितेचे कलमे लागू असणे किंवा विवक्षित उपबंधांची प्रयुक्ती.
या अधिनियमाच्या, प्रकरण तीन प्रकरण चार, प्रकरण पाच, प्रकरण पाच-क, कलम १४९ व प्रकरण तेवीसचे उपबंध, होईल तेथवर, ते भारतीय दंड संहितेच्या प्रयोजनांसाठी जसे लागू होतात तसे या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी लागू होतील.
6. Application of certain provisions of the Indian Penal Code.—Subject to the other provisions of this Act, the provisions of section 34, Chapter III, Chapter IV, Chapter V, Chapter VA, section 149 and Chapter XXIII of the Indian Penal Code (45 of 1860), shall, so far as may be, apply for the purposes of this Act as they apply for the purposes of the Indian Penal Code.
7. अपराधात दोषसिद्धी झाली असेल किंवा अपराध ठेवला असेल अशा प्रकरणात आरोपी किंवा विवक्षित व्यक्तींच्या मालमत्तेचे समपहरण किंवा जप्ती करणे.
(1) या प्रकरणान्वये दंडनीय अशा कोणत्याही अपराधाबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती सिद्धदोष ठरली असेल तेव्हा, विशेष न्यायालयाला, ठोठावण्यात येणाऱ्या शिक्षेबरोबरच, लेखी आदेशाद्वारे, घोषित करता येईल की, अशा व्यक्तीच्या मालकीची, जंगम वा स्थावर अथवा दोन्ही प्रकारची, जी कोणतीही मालमत्ता असा अपराध करण्यासाठी वापरण्यात आली असेल ती शासनाकडे समपहृत होईल.
(2) या प्रकरणाखालील कोणत्याही अपराधाचा आरोप एखाद्या व्यक्तीवर ठेवण्यात आला असेल तेव्हा तिची संपरीक्षा करणाऱ्या विशेष न्यायालयाला असा आदेश देण्याची मुभा असेल की, तिच्या मालकीची जंगम वा स्थावर वा दोन्ही प्रकारची सर्व वा कोणतीही मालमत्ता अशा संपरीक्षेच्या कालावधीत जप्त करण्यात येईल आणि जेव्हा अशी संपरीक्षा दोषसिद्धीत परिणत होईल तेव्हा अशा त-हेने जप्त करण्यात आलेली मालमत्ता या प्रकरणान्वये ठोठावण्यात आलेल्या कोणत्याही द्रव्यदंडाच्या' वसुलीसाठी आवश्यक असेल त्या मर्यादेपर्यंत समपहृत केली जाण्यास पात्र असेल.
7. Forfeiture of property of certain persons.—
(1) Where a person has been convicted of any offence punishable under this Chapter, the Special Court may, in addition to awarding any punishment, by order in writing, declare that any property, movable or immovable or both, belonging to the person, which has been used for the commission of that offence, shall stand forfeited to Government.
(2) Where any person is accused of any offence under this Chapter, it shall be open to the Special Court trying him to pass an order that all or any of the properties, movable or immovable or both, conviction, the property so attached shall be liable to forfeiture to the extent it is required for the purpose of realisation of any fine imposed under this Chapter.
कलम 8- अपराधासंबंधातील गृहीतक.
या प्रकरणाखालील अपराधांसंबंधातील खटल्यामध्ये जर असे सिद्ध करण्यात आले असेल की, -
(a) या प्रकरणाखालील * [अपराध केल्याचा आरोप करण्यात आलेल्या किंवा असा अपराध केल्याचा वाजवी संशय असलेल्या व्यक्तीने केलेल्या अपराधांच्या संबंधात कोणतेही आर्थिक सहाय्य दिले आहे तर तदविरुद्ध सिद्ध करण्यात आले नाही तर अशा व्यक्तीने त्या अपराधाला अपप्रेरणा दिली असे विशेष न्यायालय गृहीत धरील;
(b) या प्रकरणाखालील अपराध, व्यक्तींच्या एखाद्या गटाने केला असेल आणि असे सिद्ध करण्यात आले असेल की, करण्यात आलेला अपराध हा, जमिनीसंबंधातील वा अन्य कोणत्याही बाबीसंबंधातील एखाद्या विद्यमान विवादाच्या परिणामी आहे तर, असे गृहीत धरण्यात येईल की, अपराध सामाईक उद्देशाच्या पुरस्सरणार्थ किंवा सामाईक लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे.
(c) आरोपीला, पीडित व्यक्तीची किंवा त्याच्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती होती तर, न्यायालय, अन्यथा विरोधी सिद्ध झाले नाही तर, आरोपीला, पीडित व्यक्तीची जात किंवा जमातीविषयक ओळखीची जाणीव होती असे गृहित धरील.]
8. Presumption as to offences.—In a prosecution for an offence under this Chapter, if it is proved that—
(a) the accused rendered 1[any financial assistance in relation to the offences committed by a person accused of], or reasonably suspected of, committing, an offence under this Chapter, the Special Court shall presume, unless the contrary is proved, that such person had abetted the offence;
(b) a group of persons committed an offence under this Chapter and if it is proved that the offence committed was a sequel to any existing dispute regarding land or any other matter, it shall be presumed that the offence was committed in furtherance of the common intention or in prosecution of the common object;
(c) the accused was having personal knowledge of the victim or his family, the Court shall presume that the accused was aware of the caste or tribal identity of the victim, unless the contrary is proved.
9. शक्ती प्रदान करणे.
(1) संहितेमध्ये किंवा या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात, -
(a) या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी; किंवा
(b) या अधिनियमाखालील कोणत्याही प्रकरणासाठी किंवा प्रकरणांचा वर्ग वा गट यांसाठी, राज्य शासन, राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला, तसे करणे राज्य शासनास योग्य वा समयोचित वाटेल तर, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या संहितेअन्वये अशा जिल्ह्यातील किंवा प्रकरणपरत्वे, त्याच्या भागातील एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडून अशा प्रकरणासाठी किंवा प्रकरणांचा वर्ग वा गट यांसाठी वापरता येण्याजोग्या असतील अशा शक्ती, आणि विशेषतः व्यक्तींना अटक करण्याच्या, त्यांच्या अन्वेषणांच्या वा कोणत्याही विशेष न्यायालयापुढे त्यांच्यावर खटला चालविण्याच्या शक्ती, प्रदान करू शकेल.
(2) सर्व पोलीस अधिकारी आणि शासनाचे अधिकारी हा अधिनियम किंवा त्याखाली केलेला कोणताही नियम, योजना किंवा आदेश यांच्या उपबंधांच्या अंमलबजावणीसाठी पोटकलम (१) मध्ये निर्देशित केलेल्या अधिकाऱ्याला साहाय्य करतील.
(3) संहितेचे उपबंध, होईल तेथवर पोटकलम (१) खालील अधिकाऱ्याने करावयाच्या शक्तींच्या वापरास लागू होतील.
9. Conferment of powers.—
(1) Notwithstanding anything contained in the Code or in any other provision of this Act, the State Government may, if it considers it necessary or expedient so to do,—
(a) for the prevention of and for coping with any offence under this Act, or
(b) for any case or class or group of cases under this Act, in any district or part thereof, confer, by notification in the Official Gazette, on any officer of the State Government, the powers exercisable by a police officer under the Code in such district or part thereof or, as the case may be, for such case or class or group of cases, and in particular, the powers of arrest, investigation and prosecution of persons before any Special Court.
(2) All officers of police and all other officers of Government shall assist the officer referred to in sub-section (1) in the execution of the provisions of this Act or any rule, scheme or order made thereunder.
(3) The provisions of the Code shall, so far as may be, apply to the exercise of the powers by an officer under sub-section (1).